हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर: संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल 5 कोटींची पैज; नेमकं पैजेचं प्रकरण काय? Kolhapur Loksabha Election 2024

कोल्हापूर | कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानाने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी लावलेल्या 5 कोटींच्या पैजेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

काय लावली धनंजय महाडिकांनी पैज?
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होणार आहे. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. याचवेळी चंदगड इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी संजय मंडलिकांना सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देण्याची पैज लावली आहे.

लीड देणाऱ्या गावाला 5 कोटींचा निधी..
संजय मंडलिक (Sanjay Mahadik) यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यामध्ये ही शर्यत लावली असून सर्वाधिक लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचा शब्द धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिला आहे. संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची घोषणा या सभेतून धनंजय महाडिक यांनी केली आहे.

धनंजय महाडिक यांनी लावली पैज सरकारी तिजोरीतून मिळणाऱ्या निधी स्वरूपात आहे. त्यामुळे पैज लावायचीच होती तर स्वतःच्या खिशातील पैसे लावून लावायची होती.. अशी टीका आता महाडिक यांच्यावर होऊ लागली आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker