बातम्या

Dhananjay Munde राजीनामा देणार? मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजर; पडद्यामागं हालचालींना वेग..!

Dhananjay Munde: अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करत असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही, हे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, या प्रकरणावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मुंडे लवकरच राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे दबाव वाढला

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख ऊर्जाक्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहार आणि अवैध वसुली विरोधात आवाज उठवत होते. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींसह वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक केली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याचे बोलले जाते.

यासर्व घटनांमुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच मुंडेनी राजीनामा देण्याबाबत दबाव वाढत असल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीमुळेच धनंजय मुंडेंना नाइलाजाने राजीनामा द्यावा लागणार असून, तशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Back to top button