बाजारभाव

खुशखबर: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! लगेच सोनाराकडे जाऊन करा दागिन्यांची खरेदी; सोने-चांदीचा तुमच्या शहरात किती भाव? Gold Silver Price Today

Gold and silver prices slide sharply as futures market opens weak.

Gold Silver Price Today 16 February 2026: लग्नसराई, मुंजी, गृहप्रवेश किंवा इतर शुभकार्यांच्या पार्श्वभूमीवर सोनं–चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असतो. गळ्यात, हातात किंवा कानात उठून दिसणारा सोन्याचा दागिना असावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र गेल्या काही महिन्यांत सोन्या–चांदीच्या दरांनी उच्चांक गाठल्याने अनेकांचे खरेदीचे स्वप्न अपुरे राहिले होते. अशा स्थितीत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) बाजार उघडताच सोन्या–चांदीच्या किमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली आहे.

Gold Silver Price Today 16 February 2026

देशांतर्गत फ्युचर मार्केटमध्ये सोमवारी सकाळी सोन्याची चमक काहीशी फिकी पडलेली दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 एप्रिल 2026 रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 1,54,999 रुपयांवर उघडले. मागील ट्रेडिंग दिवशी हेच सोनं 1,55,895 रुपयांवर बंद झाले होते. बाजार सुरू होताच विक्रीचा दबाव वाढला आणि काही वेळातच सोन्याच्या दरात घसरण झाली. दुपारच्या सत्रात सोनं सुमारे 1.02 टक्क्यांनी, म्हणजेच जवळपास 1,600 रुपयांनी घसरून 1,54,300 रुपयांवर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्युचरने 1,55,100 रुपयांचा उच्चांक गाठला होता, मात्र तो टिकवून ठेवण्यात अपयश आले.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी एमसीएक्सवर तब्बल 3.48 टक्क्यांनी घसरली. तब्बल 8,492 रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर 2,35,868 रुपये प्रति किलोवर पोहोचला. व्यवहाराच्या सुरुवातीला चांदी 2,38,489 रुपयांवर उघडली होती. किरकोळ बाजारातही या घसरणीचा परिणाम दिसून आला. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर 2,680 रुपये असून 100 ग्रॅमसाठी ग्राहकांना 26,800 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये मात्र 10 ग्रॅम चांदी 2,800 रुपयांवर विकली जात आहे.

दरम्यान, देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत (प्रति 10 ग्रॅम):

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर | Gold Price Today 16 February 2026

शहर24 कॅरेट (₹)22 कॅरेट (₹)18 कॅरेट (₹)
दिल्ली1,56,5901,43,5501,17,480
मुंबई1,56,4401,43,4001,17,330
चेन्नई1,57,5301,44,4001,23,500
कोलकाता1,56,4401,43,4001,17,330
अहमदाबाद1,56,4901,43,4501,17,380
लखनऊ1,56,5901,43,5501,17,480
पाटणा1,56,4901,43,4501,17,380
हैदराबाद1,56,4401,43,4001,17,330
कोल्हापूर1,56,4401,43,4001,17,330

भारतातील प्रमुख शहरांमधील चांदीचे दर | Silver Price Today 16 February 2026

शहर10 ग्रॅम (₹)100 ग्रॅम (₹)1 किलो (₹)
मुंबई2,68026,8002,68,000
पुणे2,68026,8002,68,000
कोल्हापूर2,68026,8002,68,000
चेन्नई2,80028,0002,80,000
हैदराबाद2,80028,0002,80,000
कोलकाता2,68026,8002,68,000
जळगाव2,68026,8002,68,000
दिल्ली2,68026,8002,68,000

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत, डॉलरमधील चढउतार आणि नफेखोरी यामुळे अल्पकालीन काळात सोन्या–चांदीच्या दरात चढ-उतार दिसू शकतात. मात्र सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते. पुढील काही दिवसांत दर आणखी स्थिरावतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा