नोकरी

मेगाभरती: इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची भरती; पदवीधर उमेदवारांना संधी | Intelligence Bureau Bharti 2025

इंटेलिजन्स ब्युरोमार्फत सुरक्षा सहाय्यक व आयबी कार्यकारी पदांसाठी एकूण 8704 जागांची भरती जाहीर; अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 10 व 17 ऑगस्ट 2025 आहे.

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी या पदासाठी देशभरातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 4987 रिक्त पदे भरण्यात येणार असून, ही भरती देशभरातील केंद्र सरकारच्या नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी ठरू शकते.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने mha.gov.in या गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आहेत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीय व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.

उमेदवारांना अर्ज सादर करताना ₹100 इतके शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अधिकृत सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचावीत.

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी या पदासाठी आकर्षक वेतनश्रेणी देण्यात आली असून, ₹21,700 ते ₹69,100/- पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे. शिवाय केंद्र शासनाच्या सेवेतील इतर भत्ते व फायदेही लागू होतील. ही भरती देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही राज्यात नोकरी करण्यास तयार असणे आवश्यक आहे.

या भरतीमुळे सुरक्षा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेषतः केंद्र सरकारी नोकरी, स्थिरता, सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्यातील प्रमोशनच्या दृष्टीनेही ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे.

अर्ज करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तिथेच अर्ज भरण्याची लिंक, अधिकृत जाहिरात आणि सविस्तर मार्गदर्शक सूचनाही उपलब्ध आहेत.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/wNa2j
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/Sy7bw
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये “आयबी कार्यकारी” पदासाठी 3717 जागांची भरती – पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Intelligence Bureau Bharti 2025

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) विभागाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली आहे. यावेळी “IB कार्यकारी” या पदासाठी एकूण 3717 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती देशभरात करण्यात येणार असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज https://www.mha.gov.in/ या गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवी किंवा समकक्ष पात्रता धारक असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

अर्ज करताना जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹650 शुल्क तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹550 शुल्क आकारण्यात येणार आहे.

या पदासाठी पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 7 नुसार ₹44,900 ते ₹1,42,400 इतका मासिक पगार मिळणार आहे. यासोबत केंद्र सरकारकडून लागू असलेले सर्व भत्ते आणि फायदे मिळतील.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील अटी व शर्ती, परीक्षा पद्धत, syllabus, निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.

ही भरती देशभरातील तरुणांना प्रतिष्ठेची, स्थिर आणि भविष्य सुरक्षित करणारी सरकारी नोकरी देणारी संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Full Advertisement Read PDF
Online Application Link Apply Online
Official Website Official Website

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker