Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

जनता दलाचा श्रीमंत शाहू छत्रपतींना पाठिंबा; वसंतराव पाटील, खोराटे यांची घोषणा | Shahu Maharaj Chhatrapati

कोल्हापूर | शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आणि स्वाभिमान आहे, त्यामुळे देशात जरी जनता दल भाजपसोबत असला तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचा पाठिंबा शाहू महाराज यांनाच असल्याची घोषणा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आणि ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे यांनी आज केली.

कोल्हापूर जिल्हा जनता दलाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठिंबा दर्शविला आहे. आज माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ए. वाय. पाटील यांच्यासह महाविकास आघाडीशी संबंधित अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

सरवडे (ता. राधानगरी) येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज सायंकाळी उशिरा मेळावा झाला. त्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन समाजवादी नेते कै. शिवाजीराव खोराटे व माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील यांच्या वैचारिक अधिष्ठानास अनुसरून हा निर्णय घेतल्याचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील व जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे यांनी सांगितले.

प्रा आनंदराव कवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीमंत शाहू महाराज आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून या भागाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल अशी ग्वाही मालोजीराजे यांनी यावेळी दिली.

यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत साळोखे, शौकत कलोट, प्रा. एरुडकर, दत्तात्रय धनगर, लहू गुरव, बंडा पाटील, दत्ता ढोकरे आनंदराव वरुटे आदींसह गोकुळ दूध संघाचे संचालक आर के मोरे व अभिजीत तायशेटे, माजी संचालक पी डी धुंदरे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक सुशील पाटील कौलवकर आदी उपस्थित होते. एड. शिवराज खोराटे यांनी आभार मानले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा