Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

पानसरेंच्या खुनात वापरलेली दुचाकी बेळगावमधून जप्त केल्याची पंच साक्षीदाराची न्यायालयात साक्ष | Pansare Kolhapur News

कोल्हापूर | ज्येष्ठ कामगार नेते दिवंगत गोविंद पानसरे (Pansare Kolhapur News) यांच्या खुनातील आरोपींनी वापरलेली दुचाकी बेळगावमधील एका गॅरेजमधून जप्त करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची साक्ष पंच साक्षीदाराने जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी (दि. १५) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, संशयितांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही.

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर संशयित हल्लेखोर बेळगावच्या दिशेने पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने शोध घेऊन बेळगावमधील एका गॅरेजमधून संशयित दुचाकी जप्त केली होती. त्यावेळच्या पंच साक्षीदारांची साक्ष सोमवारी झालेल्या सुनावणीत नोंदवण्यात आली.

साक्षीदाराने त्यावेळचा घटनाक्रम सांगून अटकेतील संशयित भरत कुरणे याच्या भावानेच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. उलट तपासात बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारावर प्रश्नांची सरबत्ती करत दुचाकीचा खोटा पुरावा सादर केल्याचे मत मांडले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे साक्षीदाराने नाकारले. सुनावणीसाठी काही संशयित प्रत्यक्ष, तर काही संशयित व्हीसीद्वारे उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा