कोल्हापूर: वैष्णवी पोवार हिला मारहाण करते वेळी हजर असलेल्या फरारी आरोपीस अटक | Kolhapur Crime News
Summary: या गुन्ह्यातील मुख्य संशयीत बाळकृष्ण महाराज व महेश महाराज यांच्या अटकेची मागणी वैष्णवी पोवार हिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
कोल्हापूर | प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये रहात असल्याने त्याच्याशी लग्न कर किंवा त्याचा नाद सोड म्हणुन वैष्णवी पोवार हिला तिच्या आईसह भावाने आणि मामाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत (Kolhapur Crime News) तिच्या मृत्यू झाला होता. मारहाण झाली त्यावेळस उपस्थितीत असलेला रुणाल उर्फ बालाजी प्रताप डिसले (वय 26. रा.तासगाव जि.सांगली) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवार (ता.15) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या अगोदर वैष्णवीच्या आईसह तिचा भाऊ आणि मामा यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील संशयीतांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार करून माहिती घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा मारहाणीचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे असलेल्या मठात घडला होता. त्या वेळी सेवक म्हणून कार्यरत असलेला रुणाल उर्फ बालाजी डिसले हा वैष्णवीला मारहाण होताना उपस्थित होता. ज्या वेळी वैष्णवी बेशुध्द पडली त्या वेळी पहाटेच्या सुमारास गावाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तासगावला जाऊन डिसले याला अटक केली. या गुन्ह्यात त्याचा कितपत सहभाग होता याचा पोलिस शोध घेत आहेत.
वैष्णवीचा खून कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस तपास करीत असून तिच्या नातेवाईकांच्या मिळकतीची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बँकेशी पत्रव्यवहार केला असून लवकरच त्यांच्या खात्याच्या व्यवहारांचा तपशील मिळणार आहे.