कोल्हापुरातील 220 माजी नगरसेवक महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या पाठीशी | Kolhapur Loksabha Election 2024
कोल्हापूर | महानगरपालिकेच्या 220 माजी नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. न्यू पॅलेस इथं या सर्व माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूरचा पुरोगामी आवाज लोकसभेत पाठवण्याकरिता शाहू महाराजांना मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार उपस्थित माजी नगरसेवकांनी केला.
कोल्हापूरचा पुरोगामी आवाज लोकसभेत (Kolhapur Lok sabha Election 2024) पाठवण्याकरिता श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धारही या बैठकीत माजी नगरसेवकांनी व्यक्त केला. या बैठकीला एकूण 17 माजी महापौर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी, नगरसेवक हे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असतात. शहराच्या विकासामध्ये नगरसेवकांचे योगदान मोलाचं असतं. त्यामुळं येणाऱ्या काळात सर्वजण मिळून शहराचा विकास करुया. सर्वांनी एकत्र मिळून शहराचे प्रश्न सोडवूया. शिक्षण, क्रीडा यासाठी केंद्राकडून भरीव निधी मिळवण्यासाठी आपणं काम करू, असं आवाहनही यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी केलं. यावेळी 220 माजी नगरसेवकांनी एकत्र येतं पाठींबा जाहिर केल्यानं श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळं पुरोगामी कोल्हापूर शहर श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या पाठी मागे खंबीरपणे असल्याचं आज स्पष्ट झालंय. आपण सर्वजण एकदिलानं महाराजांंच्या मागे आहात. ही ताकद कायम ठेवूया असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. प्रत्येकानं आपल्या प्रभागातून मत्ताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा. प्रभागातील सभेचं नियोजन तूम्ही करा. प्रभागात महिलांच्या बैठका घ्या. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शिवाय ही उमेदवारी आपल्या घरची आहे. आपला कोल्हापूरचा हा विचार दिल्लीत पाठवायचा आहे. यासाठी माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नियोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
या आ.सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, माजी आ. मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे निरिक्षक पुरुषोत्तम दळवी हे देखील उपस्थित होते.


