Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

Kolhapur : ‘मोका’तील म्होरक्याची मिरवणूक काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न; सातजणांना अटक

कोल्हापूर | मोका कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या आरोपी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय 23, रा. नागाळा पार्क) याने कारागृहातून सुटका झाल्यानंतर साथीदारांसह मिरवणूक काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अनिकेत सूर्यवंशीसह सात जणांना अटक केली असून चार जण फरार आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची नावे:
अनिकेत सूर्यवंशी (वय 23, नागाळा पार्क), गब्बर ऊर्फ आदित्य सूर्यवंशी (वय 25), अनुराग राखपसारे (वय 20), करण ऊर्फ तुषार कुमठे (वय 22), सागर गौडदाब (वय 34), प्रथमेश कुमार समुद्रे (वय 20) आणि वेदांग पोवार (वय 30).

घटनेचा तपशील:
अनिकेत सूर्यवंशी याच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने 2021 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. कारागृहात शिक्षा भोगून जामिनावर सुटका झाल्यानंतर, 24 डिसेंबर 2024 रोजी अनिकेतला कळंबा कारागृहातून सोडण्यात आले. सुटकेनंतर त्याने साथीदारांसह दुचाकी व मोटारींच्या ताफ्यातून कळंबा कारागृहापासून नागाळा पार्क येथे मिरवणूक काढली. यावेळी त्याच्या साथीदारांसह त्याने घोषणाबाजी करत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियाचा गैरवापर:
टोळक्याने या मिरवणुकीचे व्हिडिओ रील्स तयार करून ‘आर.एस. 125’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने तपासाचे आदेश देण्यात आले.

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, महेश पाटील यांच्या पथकाने मुख्य संशयित अनिकेत सूर्यवंशीसह सात जणांना अटक केली. यावेळी पोलिसांनी तीन वाहने जप्त केली असून फरार असलेल्या चार संशयितांचा शोध सुरू आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा