Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त Message, WhatsApp Status, Images द्वारे द्या खास शुभेच्छा!
Shiv Jayanti 2025 Wishes: मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि छत्रपती, शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. महाराजांचे धैर्य, शौर्य आणि दूरदृष्टीमुळे ते संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान मानले जातात.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांनी मुघल साम्राज्य, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि युरोपियन वसाहतवाद्यांविरुद्ध संघर्ष करत स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासन उभे राहिले. इ.स. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा छत्रपती म्हणून भव्य राज्याभिषेक पार पडला.
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मिरवणुका, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र शासन आणि विविध सामाजिक संस्था महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार करत आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांच्या शिकवणींचा पुनरुच्चार करत, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात. लोक एकमेकांना व्हॉट्सअॅप मेसेज किंवा स्टेटसद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात. अशाच शुभेच्छा आम्ही येथे खास तुमच्यासाठी देत आहोत… जय भवानी! जय शिवाजी!
शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे… जय शिवराय!

चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती, म्हणतात त्याला छत्रपती!

“रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं,
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय!”

बीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा..
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा…

स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण.
देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवरायांचे गाऊया गुणगान..!

निधड्या छातीचा, दणकट कणांचा मराठी मनांचा,
भारत भूमीचा एकच राजा शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अफजल खान फार झाले!
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे, शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला,
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान..
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..!!!

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा..!

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!!


