बातम्या

छत्रपती शिवरायांची आजवर कधीही न पाहिलेली दुर्मिळे चित्रे.. ‘जी’ जगभरातल्या वस्तुसंग्रहालयांमध्ये जतन करून ठेवली आहेत.. पहा ही दुर्मिळ चित्रे..! Rare paintings of Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवरायांचे खरे चित्र कोणते? ते कसे दिसत होते? कोणत्या पद्धतीचे कपडे परिधान करत होते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नेहमी असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी महाराजांची खरी चित्रे उपलब्ध करून देत आहोत. जी अनेक संशोधक आणि अभ्यासकांनी विविध वस्तुसंग्रहालये व ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारित संशोधन करून शोधली आहेत. शिवरायांच्या विविध चित्रांचे विश्लेषण करताना त्यांच्या ऐतिहासिक संदर्भांची पडताळणी करून ही चित्रे शिवरायांचीच असल्याचे विविध संशोधकांनी स्पष्ट केले आहे. खाली दिलेली विविध चित्रे अशाच संशोधनातून आणि ऐतिहासिक संदर्भातून संग्रहित केलेली आहेत. चला तर पाहूया शिवरायांची ही खास दुर्मिळे चित्रे…

1) फ्रांस्वा वॅलेंटिन संग्रहातील चित्र – हे चित्र खऱ्या प्रतिमेस जवळचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
स्रोत: डच अधिकारी फ्रांस्वा वॅंलेंटिन यांचा संग्रह
काळ: १७१२ च्या आधी रेखाटलेले, १७८२ मध्ये प्रसिद्ध
विशेषता: चित्रावर “den heer seva Gi” असा उल्लेख आहे. “den heer” चा अर्थ सैन्य असा होतो.

2) बॉनहॅन्स कलेक्शन, लंडन
स्रोत: किशनगड चित्रशाळा
चित्रकार: निहालचंद (अंदाज)
विशेषता: महाराज एका हातात दख्खनी धोप तलवार, दुसऱ्या हातात पट्टा घेतलेले दाखवले आहेत.
या चित्राच्या शैलीत राजपूत प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

3) बडोदा संस्थान संग्रहालयातील चित्र
स्रोत: बडोदा संस्थान संग्रहालय
कालखंड: १८ वे शतक
विशेषता: चित्र राजपूत-मुघल शैलीत आहे. एका हातात फुल, दुसऱ्या हातात पट्टा असलेले शिवाजी महाराज दर्शवले आहे.

4) रॉबर्ट आर्म यांच्या ‘Historical Fragments’ मधील चित्र – त्यांच्या प्रतिमेचे जगभरातील अभ्यासकांकडून विश्लेषण
स्रोत: १७८२ साली प्रसिद्ध पुस्तक
विशेषता: इंग्रजी दस्तावेजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

5) गोवळकोंडा येथील चित्र – मूळ चित्र आकाराने लहान आहे
स्रोत: छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, मुंबई
कालखंड: १६७५ नंतर
विशेषता: हे चित्र मुंबईच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रतिकृतीसह लावले आहे.

6) रिक्स म्युझियम, हॉलंड– डच इतिहासकारांनी नोंदवलेली शिवरायांची प्रतिमा
स्रोत: डच संग्रहालय
कालखंड: १६८०
विशेषता: चित्रावर “Sivagi” असा उल्लेख

7) स्मिथ लेसोफ कलेक्शन, फ्रान्स
स्रोत: फ्रेंच संग्रहालय
कालखंड: १७वे शतक
विशेषता: अत्यंत प्राचीन चित्रांपैकी एक
फ्रान्समधील कलेच्या प्रभावाखाली रेखाटलेले असण्याची शक्यता


8) बर्लिन स्टेट लायब्ररी, जर्मनी – हे चित्र भारतातून हॉलंडमार्गे जर्मनीला नेण्यात आले
स्रोत: जर्मन ऐतिहासिक नोंदी
कालखंड: १७वे शतक
विशेषता: चित्रावर “Siuwagie gewerzere maratise vorst” असा उल्लेख, याचा अर्थ “मराठ्यांचा राजा”

9) दुसरे रिक्स म्युझियम चित्र, हॉलंड – डच दस्तावेजांमध्ये शिवाजी महाराजांविषयी नोंदी आढळतात
स्रोत: डच संग्रहालय
कालखंड: १६७५-१६८५
विशेषता: चित्रावर “Siwagii prince in decam” असा उल्लेख

10) गिमे संग्रहालय, फ्रान्स – फ्रेंच इतिहासकारांनी अभ्यासलेले
स्रोत: गिमे संग्रहालय, पॅरिस
विशेषता: शिवरायांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणारे चित्र

11) ‘Potraits of Indian Princes’ संग्रह, लंडन – ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधारे अभ्यासलेले
स्रोत: गोवळकोंडा येथील चित्र
कालखंड: १६८०-१६८७
विशेषता: ब्रिटिश संग्रहालयात संरक्षित

12) जयपूर पोथीखाना संग्रह – अंबर घराण्याशी संबंधित दस्तावेजांसह जतन
स्रोत: जयपूर पोथीखाना
कालखंड: १८वे शतक
विशेषता: इतर चित्रांच्या तुलनेत वेगळ्या धाटणीचे चित्र

13) तंजावर राजवाडा संग्रह – हे चित्र सरफोजीराजेंनी खास तयार करून घेतल्याची नोंद
स्रोत: तंजावरच्या सरफोजीराजे भोसले यांचा संग्रह
विशेषता: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व शहाजी महाराज यांचे एकत्रित चित्र

14. हे छत्रपती शिवाजी महारांचे मूळ छायाचित्र असल्याचे म्हटले जाते.
विशेषता: हे लंडन मधील एक संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे.

Back to top button