हॅलो कोल्हापूर

आवाडेंच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने पराभवाच्या छायेत? महायुतीची डोकेदुखी वाढली | Hatkanangale Loksabha Election 2024

कोल्हापूर | हातकणंगले मतदार संघातून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे लोकसभेची (Hatkanangale Loksabha Election 2024) निवडणूक लढवणार आहेत. आवाडे येत्या मंगळवारी 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने ( dhairyasheel mane ) यांना निवडणूकीत विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

आवाडेंनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास, मत विभागणीचा थेट फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सत्यजीत पाटील यांच्या उमेदवारीला साखर कारखानदारांचीही मदत मिळण्याचा अंदाज आहे. तसेच भाजपसह विविध पक्षांतील अदृश्य शक्तींचे देखील त्यांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाडे यांच्या उमेदवारीचा थेट फायदा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला होणार असल्याने महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

आज शनिवारी (12 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना प्रकाश आवाडे यांच्याशी त्यांची बैठक पार पडली. आवाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील करून पाहिला. तब्बल पाऊण तासाच्या बैठकीनंतर देखील आवाडे यांनी आपली उमेदवारी कायम असल्याचे सांगून वरिष्ठ पातळीवरून केलेल्या मनधरणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे आवाडेंच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने पराभवाच्या छायेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी दुपारी भेट घेतल्यानंतर आवाडे यांनी जरी आपली त्यांच्याशी चर्चा झाली असली तरी मंगळवारी 16 एप्रिल रोजी आपण अर्ज भरणार असल्याचे सांगितले. आवाडे यांच्या भूमिकेवर भाजपकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. किंवा भाजप कडून त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचेही दिसत नाही. त्यामुळे आवाडेंच्या उमेदवारीला भाजपचेच पाठबळ असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांशी सुमारे दोन तास चर्चा केली. दोन्ही मतदार संघातील सध्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि आमदार उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker