बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur Crime: लिव्ह इन हत्याकांडाचा थरारक शेवट; प्रियेसीला ठार करून पसार झालेल्या आरोपीने घेतला गळफास

कोल्हापूर | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या सतीश यादव याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Kolhapur Crime) समोर आली आहे. सतीश यादवने शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे कातळापुडी येथील झाडाला गळफास लावून जीवन संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघं गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कोल्हापूरच्या सरनोबतवाडी परिसरातील एका भाड्याच्या घरात त्यांचं वास्तव होतं. दरम्यान, सतीशकडून सातत्याने लग्नाचा तगादा लावला जात होता. मात्र, चार वर्षांपूर्वी समीक्षाचं लग्न झालं होतं आणि ती सध्या पतीपासून विभक्त राहत होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिने सतीशच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता.

याच वादातून समीक्षाला भाड्याची घर रिकामे करण्यास सुद्धा सांगण्यात आलं होतं. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून समीक्षा आईकडे बावड्यात राहत होती. मैत्रीणीसह ती सरनोबतवाडीमध्ये साहित्य आणण्यासाठी गाडीवरून गेल्या होत्या. यावेळी साहित्य आवरत असताना समीक्षाने सतीशला फोन केला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत सतीश घरात पोहोचला. दोघांत पुन्हा वाद झाला. त्याचा कडेलोट असा झाला की, संतप्त सतीशने थेट समीक्षाच्या छातीत चाकूने वार केले.

समीक्षा जागीच कोसळली. इतकंच नाही, तर सतीशने तिला लाथा मारून मारहाण करत घराच्या बाहेरून दरवाजा बंद करून पसार झाला. त्या प्रसंगाने समीक्षाची मैत्रीण हादरून गेली. तिने तात्काळ मित्राच्या मदतीने तिला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं.

या खुनानंतर सतीश यादव फरार होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरुवारी (दि. ५ जून) सकाळी शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी गावाजवळील झाडाला सतीश यादव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याला पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलं आहे.

या संपूर्ण घटनेमुळे कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंध, तणाव आणि वैयक्तिक भांडणातून उडालेल्या या घटनेने पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनशिपमधील गुंतागुंत आणि धोके समोर आणले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kolhapur Crime: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या क॥बावड्यातील तरूणीचा शिवाजी पेठेतील तरूणाकडून खून

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker