बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडीता 5 महिन्यांची गर्भवती, संशयित नराधमाला अटक | Kolhapur Crime News

कोल्हापूर (Kolhapur Crime News) | सोळावर्षीय अल्पवयीन युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा आणि सोशल मीडियावर छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथील 19 वर्षीय नराधमाने हे कृत्य केलं असून या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ओम ऊर्फ आर्यन सुनील तांबे या तरुणाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले होते. त्यामुळे ती आपल्या आजी – आजोबांकडे राहात होती. डिसेंबर २०२४ मध्ये संशयित तरुणाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केला.

सुमारे पाच महिन्यांची गर्भधारणा झाल्यानंतर पीडित मुलीने आठवड्याभरापूर्वी हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने शाहूवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू करत संशयिताला लगेचच ताब्यात घेतले.

पीडित मुलगी सध्या पाच महिन्यांची गर्भवती असून, तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भेडसगाव परिसरासह पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. समाजातून संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Back to top button