बातम्याहॅलो कोल्हापूर

बाळूमामांचे दर्शन घेऊन घरी जाताना चालत्या दुचाकीवर झाड कोसळले; दोघे जखमी | Kolhapur News

कोल्हापूर | श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामांचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन युवकांच्या चालत्या दुचाकीवर अचानक निलगिरीचे झाड कोसळले. या घटनेत दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि. 27) दुपारी 1.15 वाजता निढोरी-कागल रस्त्यावरील मळगे खुर्द – मळगे बुद्रुक दरम्यान घडला.

अमावस्या यात्रेसाठी करंजवडे (जि. सांगली) येथील निखिल कांबळे आणि राजरतन काळे (एमएच 10 सीजे 7076) हे मोटरसायकलवरून आदमापूर येथे आले होते. दर्शनानंतर परत जात असताना अचानक मोठे निलगिरीचे झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले.

अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत केली आणि दोघांना झाडाखालून बाहेर काढले. या दुर्घटनेत राजरतन काळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून निखिल कांबळे यांच्या छातीला मार लागला आहे. दोघांवर मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Back to top button