बातम्या

Pune Rape Case | आरोपी दत्ता गाडे गुन्हा करून कुठे गेला? महत्त्वाची माहिती आली समोर

पुणे | स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गुन्हा करून सकाळी ११ वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावी परतला. घरी आल्यावर त्याने शर्ट बदलला आणि संध्याकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्याचे शेवटचे लोकेशन शिरूर येथे आढळले. त्याचा शोध घेण्यासाठी १३ पथके कार्यरत असून, पोलिसांना माहिती मिळाली की तो ऊसाच्या शेतात लपून बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत पोलिसांना क्लीन चिट दिली. त्यांनी या प्रकरणाचे खापर डेपो मॅनेजर आणि बसस्थानकातील खाजगी सुरक्षा यंत्रणेवर फोडले. तसेच पीडीतेने कोणताही प्रतिकार न केल्याने आरोपीस गुन्हा करणे शक्य झाल्याचे सांगितले.

Back to top button