हॅलो कोल्हापूर

कोल्हापुर, पाचगाव, गारगोटी येथे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी मोफत वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु | Kolhapur Government hostel free admission 2025

कोल्हापूर | कोल्हापूर शहर व परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध शासकीय वसतिगृहांमध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

पाचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश सुरू – Kolhapur Government hostel free admission 2025

पाचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात 8 वी, 11 वी, तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर शहर व परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, कोल्हापूर किंवा थेट वसतिगृह कार्यालय, पाचगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक किरण पाटील यांनी केले आहे.

या वसतिगृहात अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या जाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, निवास व अन्य सुविधा पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी 9764745072 किंवा 9503376533 या क्रमांकावर संपर्क साधावा.


गुणवंत मुलांसाठी दसरा चौक वसतिगृहात प्रवेश खुला

दसरा चौक, कोल्हापूर येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहातही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी उत्तीर्ण झालेले व 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्याच्या हेतूने चालवले जाते.

गृहपाल एम.एन. जगताप यांनी सांगितले की, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. या वसतिगृहातही वरीलच सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन, निवास आणि इतर सुविधा दिल्या जातात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2547264 व मोबाईल 8308379099 उपलब्ध आहे.


गारगोटी येथील मुलींच्या वसतिगृहातही प्रवेश खुले

भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील मुलींचे शासकीय वसतिगृहातही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. येथे 8 वी पासून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रवेश दिला जातो. के. डी. देसाई कॉलनी, गारगोटी येथील हे वसतिगृह आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गातील विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

या वसतिगृहात मुलींना मोफत राहण्याची, जेवणाची सोय तसेच दरमहा 600 रुपये निर्वाहभत्ता, गणवेश, स्टेशनरी, व शैक्षणिक सहलीसाठी भत्ता दिला जातो. अधिक माहितीसाठी 02324-220677 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

Back to top button