स्टाफ सिलेक्शन कमिशन व्दारे यंदा होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे कॅलेंडर जाहीर, जाणून घ्या.. आणि तयारीला लागा | SSC Exam Time Table 2025-26
Check SSC CGL, CHSL, MTS, and other exam dates – Apply on time through the official website.

SSC Exam Time Table 2025-26: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने २०२५-२६ या वर्षासाठीचा नवी परीक्षा दिनदर्शिका जाहीर केली आहे. SSC मार्फत दरवर्षी देशभरातील केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया पार पडते. यंदाच्या वेळापत्रकातही अनेक महत्वाच्या परीक्षा, अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखा, अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि परीक्षा घेण्याच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत.
SSC CGL, CHSL, MTS, स्टेनोग्राफर, JE, GD कॉन्स्टेबल, दिल्ली पोलीस भरती अशा प्रमुख परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यानुसार आपली रणनीती आखता येणार आहे.
SSC परीक्षांचे महत्त्वाचे वेळापत्रक (2025):
परीक्षा | अधिसूचना तारीख | अंतिम मुदत | परीक्षा तारीख |
---|---|---|---|
Selection Post Phase-XIII, 2025 | 2 जून 2025 | 23 जून 2025 | 24 जुलै – 4 ऑगस्ट 2025 |
Stenographer Grade ‘C’ & ‘D’ Exam, 2025 | 5 जून 2025 | 26 जून 2025 | 6 – 11 ऑगस्ट 2025 |
Hindi Translators Exam, 2025 | 5 जून 2025 | 26 जून 2025 | 12 ऑगस्ट 2025 |
CGL Exam, 2025 | 9 जून 2025 | 4 जुलै 2025 | 13 – 30 ऑगस्ट 2025 |
Delhi Police SI & CAPFs Exam, 2025 | 16 जून 2025 | 7 जुलै 2025 | 1 – 6 सप्टेंबर 2025 |
CHSL Exam, 2025 | 23 जून 2025 | 18 जुलै 2025 | 8 – 18 सप्टेंबर 2025 |
MTS & Havaldar Exam, 2025 | 26 जून 2025 | 24 जुलै 2025 | 20 सप्टेंबर – 24 ऑक्टोबर 2025 |
Junior Engineer Exam, 2025 | 30 जून 2025 | 21 जुलै 2025 | 27 – 31 ऑक्टोबर 2025 |
Delhi Police Constable Exams | जुलै – सप्टेंबर 2025 | जुलै – सप्टेंबर 2025 | नोव्हेंबर – डिसेंबर 2025 |
Constable (GD) in CAPFs, NIA, SSF & Rifleman (Assam Rifles) | ऑक्टोबर 2025 | नोव्हेंबर 2025 | जानेवारी – फेब्रुवारी 2026 |
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE):
- JSA/LDC, SSA/UDC, ASO – परीक्षा 8 जून 2025 रोजी
- पुढील फेरी जानेवारी 2026 मध्ये होणार असून परीक्षा मार्च 2026 मध्ये होतील.
उमेदवारांसाठी सूचना:
उमेदवारांनी ही दिनदर्शिका लक्षात ठेवून आपल्या अभ्यासाचा कालावधी ठरवावा. तसेच, SSC ची अधिकृत वेबसाइट (https://ssc.nic.in) नियमित तपासत राहणे आणि अधिसूचना आल्यानंतर वेळेत अर्ज भरणे आवश्यक आहे.
ही दिनदर्शिका तात्पुरती असून, SSC कडून वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत अद्ययावत माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.