नोकरी

पदवीधर तरूण तरूणींसाठी सुवर्णसंधी: युनियन बँकेत 2691 अप्रेंटिस पदांसाठी भरती; महिना 15 हजार मानधन | Union Bank of India Apprentice Bharti 2025

Union Bank of India Apprentice Bharti 2025: महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अनेकांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी धडपड करावी लागते. अशा नुकत्याच महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या तरूण तरूणींसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण युनियन बँक ऑफ इंडियाने पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.

या भरती अंतर्गत 2021 नंतर पदवी उत्तीर्ण झालेल्या तरूण-तरूणींसाठी अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या अप्रेंटिस भरती अंतर्गत एकूण 2691 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे.

पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता – Union Bank of India Apprentice Bharti 2025

  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • पदसंख्या: 2691
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (Graduation) असणे आवश्यक. तसेच, पदवी 01 एप्रिल 2021 नंतर पूर्ण झालेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय – 20 वर्षे
  • कमाल वय – 28 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

  • सामान्य, OBC, EWS: ₹800/-
  • SC, ST: ₹600/-
  • PWBD: ₹400/-

पगार (Salary)

  • अप्रेंटिस: ₹15,000/- प्रति महिना

राज्यानुसार पदसंख्या

  • महाराष्ट्र – 296कर्नाटका – 305तेलंगणा – 304आंध्रप्रदेश – 549उत्तराखंड – 361दिल्ली – 69, इतर राज्यांसाठी अधिकृत वेबसाईटवर तपशील उपलब्ध आहे.

अर्ज कसा कराल?

  1. ऑनलाईन अर्ज करावा – www.unionbankofindia.co.in
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  3. अर्जाची अंतिम तारीख 05 मार्च 2025 आहे.
PDF जाहिरातUnion Bank Apprentice Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराUnion Bank Apprentice Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker